पुणे जिल्ह्यात बारामती येथील घटना
पुणे प्रतिनिधी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. अजित पवारांसह ६ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी समोर आलीय.

अजित पवार हे मुंबईहून एका नियोजित कार्यक्रमासाठी बारामतीला येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरवत असताना वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवर वेगाने आदळले. या दुर्घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.









