१६ वर्षीय अल्पवयीन मुलाने घेतला गळफास; एरंडोल शहरातील घटना

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल शहरातील डाक बंगला समोर असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात असणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राकेश राजू बारेला (वय १६, रा. डाक बंगला , झोपडपट्टी भाग, ता. एरंडोल, जि. जळगाव) असे मृत मुलाचे नाव असून ही घटना स्मशानभूमी जवळील भिंतीलगत घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश बारेला हा मजुरीचे काम करत होता. घटनेच्या दिवशी त्याने अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच स्थानिकांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालय, एरंडोल येथे दाखल केले. मात्र तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सफौ विजय पाटील तपास करीत आहेत.









