जुन्या वादातून २ गट भिडले, दगडफेकीसह सळईने केला हल्ला, १० पेक्षा अधिक जखमी !

जळगाव तालुक्यात नशिराबादमध्ये घटना
जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद गावातील इस्लामपूरा भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत दगड, विटा, लोखंडी सळई, लाकडी दांडक्यांचा वापर करण्यात आला. ही घटना रविवारी १९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी परस्परविरोधात दोन्ही गटातील एकुण ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या गटातील गुलाम गौस शेख अमीन (वय २३ रा. इस्लामपूरा, नशिराबाद) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी १८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून इस्लामपूरा भागात राहणारे अरफाद (पुर्ण नाव माहित नाही), हमीद शेख , मोईन शेख, मोईन शेख, बबलु शेख, अकीब शेख, गज्जू उर्फ गुलाम गोस, आवेश शेख, अबुजर शेख, हरीश शेख, रिजवान शेख, मुस्ताकीम शेख, ममदू शेख गनी, समीर शेख सर्व रा. इस्लामपूरा, नशिराबाद यांनी बेकायदेशीरपणे एकत्र येवून लोखंडी रॉड,लाकडी काठ्या व विटा घेवून गुलाम गौस शेख अमीन व त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला चढविला.
तर दुसऱ्या गटातील रिजवान रऊफ खान (वय २८ रा.इस्लामपूरा, नशिराबाद) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, जुन्या वादातून परिसरात राहणारे आसिफ सैय्यद, आमीन शेख बाबू, सलीम शेख बाबु, आरीर्फ अली, दानिश शेख, गुलाब अमिन, नदीम सलिम, बाबा (पुर्ण नाव माहित नाही), नावीद सैय्यद, वारीस सैय्यद, रशिद अली, अझर अली, आयान सैय्यद, नईम बाबू, रफिक अली, अख्तर अली आणि मुस्तफा नईम सर्व रा. नशिराबाद यांनी लोखंडी रॉड, विटा, दगड आणि लाकडी काठी घेवून रिजवान रऊफ खान यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर हल्ला केला. यामध्ये दोन्ही परिवारातील सदस्य हे जखमी झाले. जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकुण ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन हे करीत आहे.









