विवरे (ता. रावेर) –पारंपारीक शेतीवर अवलंबून न राहता आधुनिक, शास्त्रीय व प्रयोगशील शेतीचा पाया परिसरात मजबूतपणे घालत. जैन इरिगेशनच्या माध्यमातून केळी, संत्री, मोसंबी यांसारख्या पिकांसाठी परिसरात पहिल्यांदा ठिबक सिंचन प्रणालीचा प्रभावी वापर केला व त्याचा सखोल अभ्यास करून इतर पिकांसाठीही तिचा उपयोग करून दाखविला. परिसरातील प्रगतशील, दूरदृष्टी असलेले व शेतकरी समाजाचे मार्गदर्शक प्रगतीशिल शेतकरी मार्तंड गणपत भिरूड यांचे ४ जानेवारी रोजी निधन झाले. या निमीत्ताने प्रगतीशिल शेतीचा दिपस्तंभ गमावल्याची शोकाकुल भावना माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केली.


विवरे येथील प्रगतीशिल शेतकरी स्व. मार्तंड भिरूड यांचे उत्तरकार्यप्रसंगी आयोजित श्रध्दांजली सभेस विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, शेतकरी बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. पाटील यांनी सांगितले की, मार्तंड भिरूड यांचा जन्म १९३१ साली विवरे (ता. रावेर) येथील शेतकरी कुटुंबात झाला. १९५१-५२ मध्ये पुणे येथे शिक्षण पूर्ण करून त्यांनी परत येत कुटुंबाचा शेती व्यवसाय सांभाळला. मात्र पारंपरिक शेतीपुरते मर्यादित न राहता त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना या प्रणालीबद्दल जागृती व प्रेरणा मिळाली. १९५३ साली विवरे परिसरात पहिल्यांदा ऑइल इंजिनचा वापर करून शेती यांत्रिकीकरणाचा मार्ग त्यांनी खुला केला. कृषी अभियांत्रिकी, माती परीक्षण, किड नियंत्रण, बाजारभाव नियोजन, उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य होते. शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी विविध सहकारी संस्था व बाजार समित्यांमध्ये सातत्याने प्रयत्न त्यांनी केले. त्यांनी विवरे ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी (चेअरमन), शेती खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर, रावेर तालुका शेतीमाल प्रक्रिया संघ, खडका स्पिनिंग मिल, लेवा एज्युकेशन संस्था जळगाव, मधुकर सहकारी साखर कारखाना, भोरगाव लेवा पंचायत, टेक्निकल मेडिकल एज्युकेशन संचालक, फैजपूर परिसर शिक्षण विकास मंडळ, सुकी पाणी वाटप संस्था (चिनावल परिसर) आदी अनेक संस्थांमध्ये विविध पदांवर कार्य केले.उत्तरकार्याच्या कार्यक्रमात त्यांच्या स्मरणार्थ प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन वासुदेव कौतिक भिरूड यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माधव घनश्याम पाटील व अॅड. प्रकाश पाटील उपस्थित होते. प्रमोद भिरूड यांनी कार्यक्रमाची सुरूवात केली. यावेळी शशीकला बोरोले, डॉ. उल्हास पाटील, सुभाष पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. सुषमा पाटील, नलिनी भिरूड, प्रमोद भिरूड, लीलावती पाटील, प्रा. विजयकुमार पाटील, निर्मला पाटील, भिरूड परिवारातील मंदा भिरूड, सरला भिरूड, डॉ. अंजली भिरूड, डॉ. किरण भिरूड, डॉ. सौरभ भिरूड, सायली भिरूड, चेतन व जुईली पाटील, गुं जन दुधवाडकर यांच्यासह गोदावरी फाउंडेशन, नातेवाईक, स्नेही व परिसरातील असंख्य शेतकरी बांधव हेदेखील उपस्थित होते.









