भाजपचे महानगराध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी महापौर विजयी
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. प्रभाग ५, ६ मध्ये भारतीय जनता पक्षाला ५, शिवसेना शिंदे गटाला २ जागा मिळाल्या. तर प्रभाग ६ मध्ये माजी महापौर भाजप पुरस्कृत जयश्री धांडे या पराभूत झाल्या. तेथे शिवसेना ठाकरे गटाचे तरुण महिला उमेदवार निवडून आले.

प्रभाग क्रमांक ५: विष्णू भंगाळे आणि नितीन लढ्ढांचा विजय
प्रभाग ५ (अ) : विष्णू रामदास भंगाळे (शिवसेना शिंदे गट): ५,९४३ (५४९ मतांनी विजयी), एड. पीयूष नरेंद्र पाटील (अपक्ष): ५,३९४, प्रवीण माळी (शिवसेना ठाकरे गट): १,००८, नोटा : ३४२ (विजयी फरक: ५४९ मते), प्रभाग ५ (ब) : मंगला संजय चौधरी (शिवसेना शिंदे गट): ६,६६२ (१ हजार मतांनी विजयी), ज्योती शरद तायडे (शिवसेना ठाकरे गट): ५,६६२, नोटा : ९२२, प्रभाग ५ (क) : आशा रमेश पाटील (भाजपा): ७,९३१ (विजयी), पूजा निलेश देशमुख (शिवसेना ठाकरे गट): ३,८९३, मसरत जब्बीन मोहम्मद हनीफ (अपक्ष): ६०३, नोटा : ८१९ (विजयी फरक: ४,०३८ मते), प्रभाग ५ (ड): नितीन बालमुकुंद लढ्ढा (भाजपा): ६,४४१ (विजयी), पियुष संजयकुमार गांधी (शिवसेना ठाकरे गट): ४,२६३, अश्विन सुरेश भोळे : १,२६५, सुनील दत्तात्रय माळी: ३१०, शेख मोहम्मद सादिक: ३००, एड. विजय दाणेज: ११९, बागवान मोहम्मद हाशिम: ८५, अनिल पगारिया: ६४, नोटा : ३९९
प्रभाग क्रमांक ६ : भाजपची तीन जागांवर मुसंडी, एका जागेवर ठाकरे गटाचा विजय
प्रभाग ६ (अ) : अर्शीनबानो शोएब खाटीक (शिवसेना ठाकरे गट): ४,११४ (विजयी), जयश्री अशोक धांडे (भाजप पुरस्कृत अपक्ष): ४,०१७, हेतल महेंद्र पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट): १,५४४, कोमल वाडे (अपक्ष): ३७२, नोटा : ७०० (विजयी फरक: ९७ मते), प्रभाग ६ (ब) : एड. शुचिता अतुलसिंह हाडा (भाजपा): ४,६८२ (विजयी), जहॉंआरा बशीर खान (अपक्ष): २,०३९, पायल रिंकू चौधरी (शिवसेना ठाकरे गट): १,७०२, प्रेरणा मिश्रा (राष्ट्रवादी शरद पवार गट): ७४९, जैबुनिसा मेहमूद (समाजवादी पार्टी): ५५२, साबेरा तडवी (अपक्ष): ३१५, मंगला भारत पाटील (अपक्ष): २१०, रजनी टेकावडे (अपक्ष): १६४, नोटा: ३३४.
प्रभाग ६ (क) : अमित पांडुरंग काळे (भाजपा): ४,८१९ (विजयी), धीरज सोनवणे (शिवसेना ठाकरे गट): २,७७१, तनवीर शेख (राष्ट्रवादी शरद पवार गट): १,६१७, फिरोज शेख (राष्ट्रवादी अजित पवार गट): १,१६९, नोटा : ३६१, प्रभाग ६ (ड) : दीपक सूर्यवंशी (भाजपा): ४,०५५ (विजयी), किशोर देशमुख (शिवसेना ठाकरे गट): २,७५५, किरण लक्ष्मण राजपूत (राष्ट्रवादी शरद पवार गट): १,४६८, सय्यद फारूक (अपक्ष): १,१४७, डॉ. विकास पाटील: ५०७, जयप्रकाश साहित्या: ३०३, नितीन तायडे : १११, नोटा : ४०१









