जळगाव महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसह अपक्षांचीही दिसली झुंज
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. प्रभाग १, २ मध्ये भारतीय जनता पक्षाला ३, शिवसेना शिंदे गटाला ४ तर एका जागेवर अपक्ष महिला उमेदवाराने मनपामध्ये एंट्री केल्याने प्रभागात अभिनंदन केले जात आहे.

प्रभाग १ अ मध्ये भाजपच्या रिटा विनोद सपकाळे यांना ४ हजार ३३८ मते मिळाली. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रियंका रविंद्र मोरे यांचा ४७९ मतांनी पराभव केला. प्रियंका मोरे यांना ३ हजार ८५९ मते मिळाली. अपक्ष मेघना शिवम सोनवणे (निकम) यांना १ हजार २५४, दक्षा सोलंकी यांना ८२६, नोटा ५८३, डॉ. स्वप्नजा मोरे यांना ५९७, माजी नगरसेवक प्रिया जोहरे यांना १८६, माया अहिरे १०५, वंचित बहुजन आघाडीचे पल्लवी सुरवाडे यांना ४१ मते मिळाली. प्रभाग १ ब मध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे ॲड. दिलीप बबनराव पोकळे यांना ५ हजार १२४, शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. निलेश जाधव यांना ३ हजार ९५२ मते मिळाली. ॲड. पोकळे यांनी १ हजार १७२ मतांनी पराभव केला. इतर उमेदवार रावसाहेब पाटील यांना ९४२, अबोली गावंडे यांना ५४३, घनशाम फेगडे यांना ३१२, तर चेतन सुरेश महाले ६३०, नोटा ७०५ मते मिळाली.
प्रभाग १ क मध्ये शिवसेना शिंदे गटाचे संगीता प्रल्हाद दांडेकर यांना ४ हजार ६४२, शिवसेना ठाकरे गटाचे सरला गरुड यांना ३ हजार ५३ मते मिळाली. संगीता दांडेकर यांचा १ हजार ५८९ मतांनी विजय झाला. इतर उमेदवार काँग्रेसचे ललिता रमेश चव्हाण यांना २ हजार २८१, अपक्ष संगीता गोकुळ पाटील यांना ७२९, स्वराज्य शक्ती सेनेचे छायाबाई वाघ यांना २८६, अपक्ष फरहाना खान २०९, ॲड. आरती तिवारी ३२७, सुनंदा फेगडे ९२, नोटा ५९० मते मिळाली. प्रभाग १ ड मध्ये अपक्ष भारती सागर सोनवणे यांना ४ हजार ४५४ मते मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे फरदीन पठाण यांना २ हजार ८४४ मते मिळाली. फरदीन यांचा १ हजार ६१० मतांनी पराभव झाला. शिवसेना ठाकरे गटाचे जुनेद नासिर खान यांना २ हजार ६६० मते, काँग्रेसचे गोकुळ चव्हाण यांना १ हजार ३६६ मते, सचिन सुरवाडे ३६७, नोटा ५२० मते प्राप्त झाली.
प्रभाग २ अ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सागर श्याम सोनवणे हे बिनविरोध विजयी झाले आहे. तर २ ब मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उज्ज्वला किशोर बाविस्कर यांना ७ हजार २७६ तर अपक्ष हर्षदा अमोल सांगोरे यांना २ हजार २३ मते मिळाली. उज्ज्वला बाविस्कर हे ५ हजार २५३ मताने विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे नसरीनबी मो. असिफ मणियार यांना १ हजार ८४० मते मिळाली. राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे रेखा भगवान सोनवणे यांना १ हजार ७७४, अपक्ष शुभांगी अक्षय सोनवणे १ हजार ४६८ मते, “नोटा” ला ४२७ मते मिळाली. २ क मध्ये भाजपाचे पूजा विजय जगताप यांना ६ हजार ५७९, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पायल नवनाथ दारकुंडे यांना २ हजार ५४८ मते मिळाली. पूजा जगताप हे ४ हजार ३१ मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे सानियाबी खान यांना २ हजर २५४, शारदा बोरा ४०६, अपक्ष शितल रमेश इंगळे १ हजार ३७५, धनश्री बाविस्कर १७१, कविता सैंदाणे ८१३, नोटा ६६२ मते मिळाली.
२ ड मध्ये भाजपचे विजय लक्ष्मण बांदल यांना ६ हजार ३०४ तर अपक्ष गणेश बाविस्कर यांना २ हजार ५२६ मते मिळाली. विजय बांदल हे ३ हजार ७७८ मतांनी निवडून आले. राष्ट्रवादी श. प. गटाचे उत्तम शिंदे १ हजार २८३, काँग्रेसचे मोहम्मद हुजेफ यांना १ हजार ७४, आप पक्षाचे योगेश हिवरकर यांना ४५७, निलेश बोरा २६५, कमल हिरामण पाटील ३७६, अपक्ष अब्दुल रहीम १ हजार ९६८, अरविंद सोनवणे यांना १६५, भगवान सोनवणे ५४, नोटा ३३६ मते मिळाली.









