
कोरोना महामारीच्या काळात गोरगरीबांना किराणा मालासह जीवनाश्यक साहित्य वाटप
पारोळा (प्रतिनिधी ) – देशात कोरोनाचा हाहाकार माजला असून साधारणता दोन – तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाउन मुळे मजूर वर्ग , कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे .
अश्या गोरगरिबांच्या पाठीशी, मदतीसाठी पारोळा तालुक्यातील समस्त नाथजोगी समाज उभा राहिला आहे .नाथजोगी समाज मंडळ पारोळा यांचे मार्फत आदरणीय श्री गुरु गोरक्षनाथ महाराज यांचे सुचित सद्द विचारांनी प्रेरित सामाजिक बांधीलकी ठेऊन नाथजोगी समाजाकडून गोरगरीब , मजूर आणि कामगार वर्गातील लोकांना किराणा मालासह जिवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आले.
यावेळी नाथजोगी समाजाचे अध्यक्ष :- जितेंद्रनाथ अशोक नाथजोगी, (तलाठी आप्पा ) सचिव :- संतोषनाथ तुकडूनाथ जोगी, जेष्ठ सल्लागार वसंतनाथ झेंडूनाथ जोगी, भिकननाथ चिंधुनाथ जोगी, सभासद:- ईश्वरनाथ हरीनाथ जोगी, रविंद्रनाथ शंकरनाथ जोगी, किशोरनाथ गोपालनाथ जोगी, देविदासनाथ बंडूनाथ जोगी, पियुषनाथ राजेंद्रनाथ जोगी, योगेशनाथ जगननाथ जोगी, ऋषिकेशनाथ अरुणनाथ जोगी, आदी समाज बांधव उपस्थित होते..







