प्रभाग ७ ‘ड’ च्या विकासाचा नवा चेहरा : नागरिकांचा नवा आशावाद
जळगाव(विशेष प्रतिनिधी) : “सेवा हीच ओळख आणि विकास हेच ध्येय” हे ब्रीदवाक्य घेऊन जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अत्तरदे चंद्रशेखर प्रकाश यांनी प्रभाग क्र. ७ ‘ड’ मध्ये आपल्या प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. राजकीय वारसा, उच्च शिक्षण आणि विकासाची तळमळ असलेल्या अत्तरदे यांच्या रूपाने प्रभागाला एक सुशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

चंद्रशेखर अत्तरदे यांना समाजसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्यांच्या आई रजनी प्रकाश अत्तरदे या जळगाव मनपाच्या माजी नगरसेविका असून वडील शेतकरी होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या पत्नी सौ. माधुरी अत्तरदे यांनी जळगाव जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सासरे नारायण मधुकर पाटील (माजी नगराध्यक्ष) आणि शालक मुकेश पाटील (नगरसेवक, भुसावळ) अशा सक्षम राजकीय कुटुंबातून येत असल्याने प्रशासकीय कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. अत्तरदे हे केवळ राजकारणी नसून पक्षाशी आणि विचारांशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आहेत.
जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्याची दखल घेत जुलै २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांचा विशेष सत्कार केला होता.नव्या विचारांची ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या चंद्रशेखर अत्तरदे यांना प्रभागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. “मतदार महायुतीचा, साक्षीदार विकासाचा” हा नारा आता प्रभाग ७ ‘ड’ च्या घराघरात पोहोचला आहे. “प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा संकल्प आहे आणि त्यासाठी मी पारदर्शकतेने काम करण्यास कटिबद्ध आहे,” असा विश्वास चंद्रशेखर अत्तरदे यांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग ७ ‘ड’ साठी अत्तरदे यांचा ‘विकासाचा रोडमॅप’
निवडणूक जाहीरनाम्यात अत्तरदे यांनी प्रभागाच्या कायापालटासाठी काही महत्त्वाची आश्वासने दिली आहेत.
पायाभूत सुविधा : दर्जात्मक रस्ते, २४ तास पाणीपुरवठा आणि हाय-टेक पथदिव्यांद्वारे प्रत्येक गल्ली प्रकाशमान करणे.
आरोग्यसंपन्न प्रभाग : नियमित कचरा संकलन, औषध फवारणी आणि महिला-मुलांसाठी फिरते दवाखाने सुरू करणे.
महिला सुरक्षा : प्रभागात सीसीटीव्हीचे जाळे विणून महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणे.
तरुणांसाठी संधी : ई-लर्निंग सेंटर्स, सुसज्ज वाचनालये आणि उद्यानांचे सुशोभीकरण करणे.
पारदर्शक कारभार : ‘नगरसेवक आपल्या दारी’ उपक्रमातून थेट संवाद आणि प्रभागाच्या निधीचा लेखाजोखा दर सहा महिन्यांनी जनतेसमोर मांडणे.










