उपस्थितीचे उमेदवार ललितकुमार घोगले यांचे आवाहन
जळगाव ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे विधानपरिषदेतील आमदार एकनाथराव खडसे यांची उद्या, शनिवार दि. १० जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक १२ मध्ये भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून खडसे मतदारांशी संवाद साधणार असून आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि महाविकास आघाडीची पुढील रणनीती यावर खडसे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग १२ मधील स्थानिक समस्या आणि विकासकामांचा आढावा देखील या सभेत घेतला जाण्याची शक्यता आहे. सभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून प्रभागात ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत.
“लोकशाही बळकट करण्यासाठी आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत,” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. या सभेमुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता असून, खडसेंच्या भाषणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सभेचा तपशील
स्थळ: गोदावरी पिठाची चक्की चौक, प्रभाग क्रमांक १२.
वेळ: सायंकाळी ठीक ६:०० वाजता.









