राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उमेदवार अलका सपकाळ (देशमुख) यांच्या प्रचाराचा झंझावात
जळगाव ( प्रतिनिधी ) – निवडणुकीचे वारे वाहू लागताच प्रभाग १९ ‘क’ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवार अलका राजेंद्र सपकाळ (देशमुख) यांच्या प्रचाराने आता जोर धरला असून, सकाळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रामेश्वर कॉलनीतील मोठे हरेश्वर हनुमान मंदिर येथे श्री हनुमानाचे दर्शन घेऊन रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही रॅली एमडी एस कॉलनी, तुलसी नगर, नागसेन नगर, साई प्रसाद कॉलनी, तुळजा माता नगर, सुनंदा किराणा परिसर,सुपसदन बंगला, मराठे गल्ली आणि हनुमान मंदिर परिसर आदी प्रामुख्याने प्रभागातील विविध भागांतून मार्गस्थ झाली.
या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे तरुणांचा अभूतपूर्व उत्साह. अलका सपकाळ यांना विजयी करण्याचा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यावेळी आशिष राजपूत, विनोद ढमाले, संदीप येवले, मनीष चौधरी, गीतेश पवार, अभिजित राजपूत, आकाश काळे, ऋषिकेश राजपूत, चेतन राजपूत, अक्षय गवई, पार्थ वाघ, अजय सोनवणे, ऋषिकेश पवार, राहुल पाटील, अमोल पणाड, आकाश राजपूत, गौरव डांगे, आनंद अहिरे, कुणाल जुमडे, पार्थ बोरसे, अविनाश पाटील, संकेत म्हस्कर, पंकज राठोड, कृष्णा उथपा, महेश ठाकूर, गोलू ओतारी, हर्षल पाटील, निखिल शेलार, हर्षल जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी परिसर पिंजून काढला.
रॅली दरम्यान महिला मतदारांनी ठिकठिकाणी उमेदवार अलका सपकाळ यांचे औक्षण करून स्वागत केले. मतदारांशी थेट संवाद साधताना, प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन सपकाळ यांनी दिले. “प्रभागाच्या प्रगतीसाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी ‘तुतारी’ चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेसला कौल द्यावा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. या भव्य रॅलीमुळे प्रभाग १९ ‘क’ मध्ये अलका सपकाळ यांचे पारडे जड झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.









