जुन्या जळगावात भाजपचा शंखनाद; विठ्ठल मंदिरात नारळ वाढवून प्रभाग १६ मध्ये प्रचाराचा झंझावात !
जळगाव प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आज जुन्या जळगावातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिर येथून मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. प्रभाग १६ मधील भाजपच्या उमेदवारांच्या विजयाचा संकल्प करत आणि विठ्ठलाचे आशीर्वाद घेऊन नारळ वाढवण्यात आले, त्यानंतर भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीने संपूर्ण प्रभागातील वातावरण भाजपमय केले असून उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, या रॅलीत प्रभाग १६ ‘अ’ मधून बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांचे मनोबल वाढवले.

विठ्ठल मंदिर (विठ्ठल पेठ) येथून सुरू झालेली ही प्रचार रॅली बाहेर पुरा, बुनकर गल्ली, जय भोले, बदाम गल्ली, धांडे वाडा, मरी माता आणि बारी वाडा या मार्गे निघाली. त्यानंतर तेली चौक, होले वाडा, सुनील खडके यांच्या निवासाजवळून खडके वाडा, डॉन टेलर गल्ली, पोलीस पाटील चक्की, दत्त मंदिर कासारवाडा, भैया भाऊंचे घर, गाय वाडा, राजाराम मंगल कार्यालय गल्ली आणि स्मशानभूमी रोड अशा सर्व प्रमुख गल्ल्यांमधून ही रॅली फिरली. या दरम्यान स्थानिक नागरिकांनी जागोजागी उमेदवारांचे स्वागत केले. शेवटी सुनील खडके यांच्या कार्यालयाजवळ या रॅलीची सांगता झाली.
याप्रसंगी प्रभाग १६ ‘ब’ च्या उमेदवार वंदना संतोष इंगळे, १६ ‘क’ च्या उमेदवार रंजना विजय वानखेडे आणि १६ ‘ड’ चे उमेदवार सुनील वामनराव खडके यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, माजी नगरसेवक प्रदीप रोटे, सरचिटणीस किसन मराठे, प्रदेश कार्य सदस्य संतोष इंगळे, महानगर कोषाध्यक्ष विजय वानखेडे, माजी मंडळ अध्यक्ष सुनील सरोदे, अनिल चौधरी, हितेश खडके, योगेश डोळे, पूजा सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते बाळाभाऊ सोनवणे यांचा समावेश होता. या रॅलीला लाभलेली नागरिकांची प्रचंड गर्दी भाजपची ताकद अधोरेखित करणारी ठरली.

प्रचाराच्या या पहिल्याच फेरीत कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. योगेश काळे, ललित चौधरी, विजय दीक्षित, एकनाथ भावसार, रुपेश सरोदे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला आणि युवकांनी ‘कमळ’ चिन्हाच्या विजयाच्या घोषणा देत संपूर्ण प्रभाग दणाणून सोडला. या रॅलीमुळे प्रभाग १६ मध्ये भाजपने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.









