प्रभाग ७ मध्ये प्रचारफेरी मध्ये नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत
जळगाव प्रतिनिधी

निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग ७ ‘ड’ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारासाठी आज सकाळी भव्य रॅली काढण्यात आली. गणेश कॉलनीतील विविध परिसरात नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला.
प्रचारादरम्यान उमेदवारांनी विविध भागात जाऊन मतदारांशी संवाद साधला. रॅलीत प्रभाग ७ चे चौघे उमेदवार दीपमाला काळे, अंकिता पाटील, विशाल भोळे, चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह चेतन तिवारी, मयूर भोळे आदींनी सहभाग घेतला.
या रॅलीमध्ये तरुणांचा उत्साह लक्षणीय होता. ठिकठिकाणी मतदारांनी उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे औक्षण करून स्वागत केले. प्रभागाच्या विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भाजपला कौल द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.










