जळगाव प्रतिनिधी
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात आज सावित्रीबाई फुले यांची जयंती निमीत्त अभिवादन करण्यात आले
यावेळी संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याला उेाळा देतांना सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखले आणि त्या काळातील सामाजिक विरोध, रूढीवादी मानसिकता यांचा धाडसाने सामना करत महिला शिक्षणासाठी पुढाकार घेतला. सावित्रीबाई फुले भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने पुण्यात १८ शाळा स्थापून मुली व वंचित समुदायासाठी शिक्षणाची उजळणी केली. याशिवाय, डॉ. वारके यांनी फुले यांचे सामाजिक न्याय, समानता, अस्पृश्यता निर्मूलन, विधवा पुनर्विवाह आणि बालहत्या प्रतिबंध यांसारख्या महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा क्षेत्रातील योगदानावरही प्रकाश टाकला. फुले यांचे हे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक समतेचा संदेश देणारे होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा. प्रज्ञा बाविस्कर यांनी केली, तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शावर आधारित प्रेरणादायी वक्तव्ये सादर केली.या जयंतीने उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक समता आणि निस्वार्थ सेवा यांचे महत्त्व एकदा पुन्हा जाणवले.