जळगावला प्रभाग १२ मध्ये भाजपची मोर्चेबांधणी
जळगाव (प्रतिनिधी): आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या प्रभागात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत असून, नागेश्वर कॉलनी, त्र्यंबक नगर, संभाजीनगर स्टॉप आणि महाबळ परिसरात प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे.


प्रभाग १२ अ अनिल सुरेश अडकमोल, १२ क गायत्री इंद्रजीत राणे, १२ ड मधून नितीन मनोहर बरडे हे प्रमुख उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. या उमेदवारांनी प्रभागातील विविध भागांत मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली असून, विकासाच्या मुद्द्यावर भर दिला जात आहे. जळगाव भाजप मंडळ क्रमांक ३ (सरदार वल्लभभाई पटेल, रामानंद नगर व महाबळ परिसर) चे अध्यक्ष अजित राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची मोठी फौज प्रचारात सक्रिय झाली आहे. उमेदवारांच्या प्रचारार्थ महाबळ परिसरात जनसंपर्काची सुरुवात करण्यात आली.

यावेळी झालेल्या बैठकीत आणि रॅलीमध्ये भाजपचे अनेक सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सोनू पाटील, सागर ढेगे, संजय अत्रे, राजेश शिरसाठ, सचिन अडकमोल, बबलू शिंदे, राजेश साळुंखे, नरेंद्र मोरे, पियुष महाजन, भावेश कोल्हे, केतन अत्तरदे, रोहित देवरे, अजय चौधरी, सचिन बोरसे, मिलिंद नारखेडे, खुशाल महाजन, शतायु भोगे, अंकुर खाचणे, मृणाल पाटील, संकेत कापसे, नीरज बरडे, अजिंक्य पाटील, संतोष भंगाळे, ललित पाटील, सुदर्शन चौधरी आणि संतोष पाटील आदींनी सहभाग घेतला.
परिसरातील जनसंपर्कावर भर
नागेश्वर कॉलनी, संभाजी नगर स्टॉप आणि महाबळ या महत्त्वाच्या भागांत कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. प्रभागातील प्रलंबित प्रश्न आणि भाजपच्या माध्यमातून करण्यात आलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम या फळीकडून केले जात आहे. शनिवारी सुरू झालेला हा दौरा प्रभागाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.









