९ ब मध्ये प्रतिभा गजानन देशमुख निवड निश्चित
जळगाव (प्रतिनिधी):- येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने विजयी सुरुवात सुरू केलेली आहे. दिवसभरात त्यांचा आता तिसरा उमेदवार बिनविरोध झालेला आहे. प्रभाग क्रमांक ९ ब मध्ये प्रतिभा गजानन देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

महानगरपालिकेमध्ये बुधवारी संध्याकाळी भाजपच्या उज्वला बेंडाळे यांनी बिनविरोध येण्याचा श्री गणेशा केला. यानंतर आज गुरुवारी सकाळी १८ अ मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांच्या नंतर दुपारी ९ अ मध्ये मनोज सुरेश चौधरी हे शिवसेनेचे बिनविरोध निश्चित झाले. यानंतर आता संध्याकाळी ९ ब मध्ये प्रतिभा गजानन देशमुख यांचा विजय निश्चित झाला आहे.
प्रतिभा गजानन देशमुख यांना शिवसेनेने अधिकृत उमेदवारी ९ ब मधून दिली होती. त्यांचे विरोधात अपक्ष उमेदवार प्रतिभा सुधीर पाटील या लढत होत्या. मात्र माघारीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी दुपारी निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे प्रतिभाताई देशमुख यांचे बिनविरोध निवडीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. विजयानंतर प्रतिभा देशमुख आणि त्यांचे समर्थक आणि तसेच शिवसेनेने विजय जल्लोष सुरू केला आहे.









