शिवसेनेचे महानगरप्रमुख संतोष पाटील यांचे भूमिका
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून महानगर प्रमुख संतोष पाटील यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून मोठ्या उत्साहामध्ये सोमवारी पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज भरला होता मात्र रात्रभरातून सूत्र फिरले आणि त्यांचे तिकीट कापले गेले तिकीट कापले मात्र पक्षाची गद्दारी करणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची महायुती झाल्यामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकीट कापले गेले आहे यामध्ये शिवसेना महानगर प्रमुख संतोष पाटील यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून सोमवारी पाचोर्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरला होता त्यांच्यासोबत आणखी चार उमेदवारांना देखील अर्ज भरला होता
मात्र मध्यरात्री अचानक सूत्र फिरली आणि संतोष पाटील यांचे तिकीट रद्द करण्यात आले याबाबतची माहिती संतोष पाटील यांना मिळतात त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली मात्र पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी संतोष पाटील यांची मनधरणी केली पुढील काळात पक्षाकडून विविध भूमिकेमध्ये तुम्हाला सामावून घेण्यात येईल असे त्यांना सांगितले आपल्याला पक्ष महत्त्वाचा आहे आपण पक्षाचा विचार करूया असे नेत्यांकडून संतोष पाटील यांना सांगण्यात आले यानंतर संतोष पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मला वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे मी माघारी फिरलो आहे आपल्याला पक्षाशी कुठल्याही पद्धतीने गद्दारी करायची नाही आपली भूमिका ठरलेली आहे असेही ते म्हणाले.









