पाचोरा (प्रतिनिधी) – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शरदचंद्रजी पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 21 वा वर्धापन दिन कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळत उत्साहात संपन्न झाला, यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांचे हस्ते राष्ट्रवादी पक्षाच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले . यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 15 जून रोजी पाचोरा भडगाव तालुक्यासाठी येथील एम एम महाविद्यालयाच्या किमान कौशल्य विभागात सकाळी नऊ वाजता भव्य रक्तदान शिबिर सर्व सामाजिक बंधनाचे काटेकोर पालन करत आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मास्क परिधान करून आणि सोशल डिस्टंसिंग पाळत एक सामाजिक संदेश देखील दिला.
यावेळी नगर परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष सतीश चौधरी ,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष किरण देवरे ,नगरसेवक विकास पाटील,वासुदेव महाजन,अशोक मोरे,पी डी भोसले,रणजीत पाटील, बशीर बागवान, व्ही.टी. जोशी,सुरेश देवरे ,खलील देशमुख,योगेश पाटील, शशिकांत चंदिले, नरेंद्र ठाकरे, हारुण देशमुख,अजहर खान,सुचेता वाघ, ज्योती वाघ, जि.प. सदस्य श्रद्धा महिला आघाडी तालुका अध्यक्ष सरला पाटील, सत्तार पिंजारी सुभाष पाटील,भागवत महालपुरे, प्रकाश पाटील, ऍड अविनाश सुतार विनोद पाटील,प्राचार्य एन.एन.गायकवाड, ए बी अहिरे, शांताराम चौधरी जयश्री मिस्तरी, संजय सूर्यवंशी,बी एस पाटील यांचेसह सर्व व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ए.जे. महाजन यांनी मानले.








