बोदवड तालुक्यातील शिरसाळा फाट्यावरील घटना
बोदवड (प्रतिनिधी):- मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी आकाराऊत येथील एका ७३ वर्षीय वृद्धाचा रस्ते अपघातात झालेल्या गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कडू विठ्ठल गायकवाड (वय ७३, रा. पिंपरी आकाराऊत, ता. मुक्ताईनगर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास हिंगणा गावाजवळील शिरसाळा फाट्यावर त्यांचा रस्ते अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली अपघातानंतर त्यांना तातडीने जळगाव येथील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचार सुरू असतानाच दि. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:२५ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
बोदवड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नंदकिशोर रामराव धनके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









