• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

 आमचे तिकीट वाटप उद्या दुपारपर्यंत फायनल,  बंडखोरांसाठी आमच्याकडे औषध उपलब्ध

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

मंत्री गिरीश महाजन यांची पत्रकारांना माहिती

जळगाव (प्रतिनिधी) – भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून आम्ही महायुती करणार आहोत. महानगरपालिका निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार आहोत. जागा वाटपाचे सूत्र आणि उमेदवारांची यादी उद्या रविवारी दुपारी फायनल होईल आणि ती आम्ही ३० तारखेला जाहीर करू अशी माहिती राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना बैठकीत दिली.

भारतीय जनता पक्षातर्फे जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. महानगरपालिकेमध्ये महायुती मिळून भाजप लढणार असल्याचे आता स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी दि. २७ रोजी संध्याकाळी भाजप कार्यालय जी.एम. फाउंडेशन येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये निवडणूक प्रमुख आमदार राजूमामा भोळे,  निवडणूक प्रभारी आ. मंगेश चव्हाण, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळेला बोलताना ना. गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना शाब्दिक चिमटे घेतले. तिकीट वाटप लवकरच जाहीर होणार असून ज्यांना तिकीट मिळाले त्यांनी जोमाने कामाला लागायचे आहे. तसेच ज्यांना तिकीट मिळाले नाही, त्यांनी नाराज व्हायचे नाही. त्यांना पक्षातर्फे भविष्यात दुसऱ्या भूमिका दिल्या जातील. सर्वांनी पक्षासाठी मिळून लढायचे आहे. दिलेल्या उमेदवाराचा जोमाने प्रचार करून महायुतीला मोठ्या बहुमताने निवडून आणायचे आहे असे ते म्हणाले.

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आमच्या चर्चा सुरू असून आम्ही महायुती म्हणून लढावे असे वरतून हायकमांडकडून आदेश आलेले आहेत. मी उद्या रविवारी दुपारपर्यंत जळगावात आहे. तोवर आम्ही जागावाटप फायनल करून उमेदवारांची यादी अंतिम करणार आहोत. ३० तारखेला ती आम्ही सकाळी जाहीर करू असे आमचे साधारण नियोजन असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान निवडणुकीमध्ये अनेक नाराज निष्ठावंत व कार्यकर्ते बंडखोरी करतील किंवा अपक्ष लढवतील याबाबत आपण काय भूमिका घ्याल ? या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले की,  बंडखोरांसाठी आमच्याकडे औषध उपलब्ध आहे. आम्ही त्याचा वापर करू. भविष्यामध्ये शिस्तभंगाची कार्यवाही त्यांच्यावर करू. बंडखोरांनी समजून घ्यावे असे मी आवाहन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.


 

 

Tags: aa.girish mahajan patrakar parishad jalgaon
Previous Post

भक्त प्रल्हादची कथा ही अढळ भक्तीचे उदाहरण : हभप सूर्यभान महाराज

Next Post

भाजपात अपेक्षित बंड होणार का थंड ? निष्ठावंत कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे नेत्यांचे प्रयत्न सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भाजपात अपेक्षित बंड होणार का थंड ? निष्ठावंत कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे नेत्यांचे प्रयत्न सुरू

भाजपात अपेक्षित बंड होणार का थंड ? निष्ठावंत कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे नेत्यांचे प्रयत्न सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!
1xbet russia

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !
1xbet russia

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1xbet russia

जळगावात विवाहितेवर अत्याचार; रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 28, 2026
वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

June 28, 2026
अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

अहो.. जिल्हाधिकारी साहेब, एसपी साहेब… !

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon