जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोहण २०२५’ आयुष इंटर कॉलेज क्रिकेट टूर्नामेंटमध्ये डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या संघाने विजेतेपद प्राप्त केले आहे.

या स्पर्धेत आयुष कॉलेजेस च्या अनेक संघानी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजने यजमान शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय, जळगाव यांच्या संघाचा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विजयाबद्दल विजयी संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील,डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांनी खेळाडूंचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. संघाच्या या यशात प्राचार्य: डॉ. आर. के. मिश्रा,क्रीडा शिक्षक व सहाय्यक प्राध्यापक: डॉ. प्रतिक पाटील, व्यवस्थापक: श्री. राजीव जामोदकर या मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले:तसेच महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचे या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.










