
कार्यक्रमात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी धैर्य, देशभक्ती आणि सामाजिक मूल्ये प्रभावीपणे सादर केली. गटचर्चा, वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. प्रथम वर्षातील प्राध्यापकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट समन्वयन केले तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित होता. वक्तृत्व स्पर्धेत कु. राजश्री यादव या विद्यार्थीने प्रथम क्रमांक पटकावला. गटचर्चा स्पर्धेत प्रथम वर्ष विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळवला. चर्चेदरम्यान सर्व मुद्दे प्रभावीपणे मांडून योग्य निष्कर्ष सादर करण्यात आला. या गटातून कु. श्रावणी चोपडे यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केली. वादविवाद स्पर्धेत प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीचे विद्यार्थी विजेते ठरले. त्यात अश्विनी लोहार या विद्यार्थिनीने उल्लेखनीय कामगिरी केली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी मोहित चौधरी यानी केले. कार्यक्रमाचे यशस्वी परीक्षण परीक्षक प्रा. सागर पाटील, प्रा. प्रवीण सोनवणे, प्रा. सम्यकरत्न कांबळे आणि प्रा. पूजा वानखेडे यांनी केले. वीर बाल दिवसाचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, माहितीपूर्ण आणि यशस्वी ठरला.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील(सदस्य), डॉ. वैभव पाटील(डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक करत विजेत्यांचे अभिनंदन केले.









