शिव कॉलनी परिसरासह प्रभागात दांडगा, प्रभावी जनसंपर्क
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ७ येथून शिव कॉलनी भागातून भारतीय जनता पक्षातर्फे काही प्रमुख चेहरे चर्चित आहेत यामध्ये पंकज सुरेश पाटील हे मागील दोन टर्म निवडणूक लढविलेले उमेदवार असून त्यांचा प्रभाग क्रमांक ७ मध्ये दांडगा जनसंपर्क आहे. यंदा भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक ७ मध्ये पंकज सुरेश पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे.

प्रभाग क्रमांक ७ येथे शिव कॉलनी, आशाबाबा नगर, रिंग रोड, गणेश कॉलनी, एलआयसी कॉलनी, ख्वाजामिया चौक, गजानन कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, गंधर्व कॉलनी, शिक्षक वाडी, शामराव नगर, फॉरेस्ट कॉलनी, मित्र नगर असे काही महत्त्वाचे प्रभाग येतात. हा प्रभाग आमदार राजूमामा भोळे यांचा प्रभाग आहे. या प्रभागांमध्ये शिव कॉलनी भागातून पंकज सुरेश पाटील यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी पक्ष नेतृत्वाकडे जोर धरला आहे.
२०१३ मध्ये खान्देश विकास आघाडीमधून पंकज पाटील यांनी तर २०१८ मध्ये शिवसेनेकडून पंकज पाटील यांच्या सुविद्य पत्नी अंकिता पाटील यांनी निवडणूक लढली होती. दोन्ही वेळेला क्रमांक दोनची मते त्यांना मिळाली होती. मात्र यंदा चित्र बदलले असून परिसरातील नागरिक तरुण तडफदार नेतृत्वाची मागणी करत आहेत. यामध्ये पंकज सुरेश पाटील यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता त्यांना यंदा भाजपाने संधी द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.









