जळगाव शहरातील कासमवाडी येथील घटना

जळगाव प्रतिनिधी : घरी पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडल्याने मुकेश रामा माळी (वय ४५, रा. कासमवाडी, जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि. १६ डिसेंबर रोजी कासमवाडी परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील कासमवाडी परिसरात मुकेश माळी हे वास्तव्यास होते. मंगळवार त्यांच्या राहत्या घरात पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना लागलीच नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









