जिल्हा सामान्य रुग्णालय,च्या सहकार्याने कार्यशाळा संपन्न
जळगाव ( प्रतिनिधी ) – बारी समाज माध्यमिक व उच्च.माध्यमिक विद्यालयात आज विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य बाबत कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथून मानसशास्त्रज्ञ दौलत निमसे पाटील, व समुपदेशक ज्योती पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर हे होते. प्रमुख अतिथी पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील, मानसशास्त्रज्ञ दौलत निमसे पाटील, समुपदेशक ज्योती पाटील हे उपस्थित होते.
मानसशास्त्रज्ञ दौलत निमसे पाटील यांनी मानसिक आरोग्य बाबत विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये असणाऱ्या गैरसमज, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा बाबत असणारा ताण तणाव, अभ्यासात एकाग्रता नसणे,यावरती उपचार समुपदेशन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. समुपदेशक ज्योती पाटील यांनी येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. व्यसन म्हणजेच दारू,तंबाखू, बिडी, सिगारेट नव्हे तर मोबाईल सुद्धा एक व्यसनच आहे.
त्यामुळे झोपेची समस्या, शारीरिक व्याधी,मानसिक व्याधी, बौद्धिक व्याधीला सामोरे जावे लागते.त्या सगळ्या समस्या उद्धभवल्यानंतर काय करावं म्हणून बऱ्याचदा सुचत नाही.म्हणून टेलीमानस टोल फ्री नंबर 14 416 हेल्पलाइन शी संपर्क केला असता मानसोपचार तज्ञ मानसतज्ञ यांची मदत वेळोवेळी आपल्या सदैव होत असते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून मुलांचे मोटिवेशन केले.
सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक सुनील भदाणे यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा आस्वार यांनी केले. तर आभार चंद्रकांत कुमावत यांनी मानले.









