जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील अजिंठा चौकात दोन गटांनी बेशिस्तपणे वर्तन करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याची घटना रविवारी, २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली. अचानक झालेल्या या मारामारीमुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
संकेत मराठे आणि पप्पू मराठे यांचा गट तसेच जावेद बासीद पिंजारी आणि आकीब शकील पिंजारी या दोन्ही गटांमध्ये कोणतेही ठोस कारण नसताना वादावादी झाली. त्यातूनच सार्वजनिक ठिकाणी मारामारी सुरू झाली. परिसरातील नागरिकांनी गोंधळ पाहताच एमआयडीसी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चारही जणांना ताब्यात घेतले.
या प्रकारामुळे अजिंठा चौकातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी शिस्त लावून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित संकेत मराठे, पप्पू मराठे, जावेद बासीद पिंजारी आणि आकीब शकील पिंजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चंद्रकांत पाटील करीत आहेत.









