आ. अमोल पाटील यांच्या उपस्थितीत निवडणुकीचा माहोल तापला!
एरंडोल (प्रतिनिधी) – आगामी एरंडोल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, दि. २२ नोव्हेंबर रोजी भाजप-शिवसेना युतीच्या वतीने शहरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली, ज्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले.
या रॅलीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर तसेच प्रभाग क्र. ९ चे उमेदवार नितेश कैलाश चौधरी आणि जिजाबाई वसंत पाटील हे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे, प्रभाग क्र. १० चे उमेदवार मनकार्नाबाई चैत्राम चौधरी आणि नोएम खॉं दलशेरखॉ यांच्या प्रचारार्थ देखील ही रॅली काढण्यात आली.प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आणि प्रचार रॅलीनंतर प्रभाग क्र. ११ आणि प्रभाग क्र. ७ मधील पण प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किशोरभाऊ काळकर, रमेशभैय्या परदेशी, रवींद्र महाजन, मनोजभैय्या पाटील, अशोक चोधरी, संजू साळी, आर्शिवाद पाटील, राजुआबा चोधरी, बबलू चोधरी, किशोर चोधरी, प्रकाश ठाकूर, चंदू जोहरी, गुड्डू जोहरी, दशरथ चोधरी, सुनील चोधरी, मालती अमोल वाणी, संजय सुरेश पाटील, मंजुळाबाई नत्थू चोधरी, धनंजय खैरनार, अतुल मराठे यांच्यासह युतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य रॅलीमुळे आणि कार्यालयाच्या उद्घाटनामुळे एरंडोल शहरात भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने जोरदार वातावरण तयार झाल्याचे दिसून आले.










