सौ.प्रतिभा चव्हाण यांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्याचे आ. मंगेश चव्हाण यांच्या विकासकामांची दखल घेऊन, येथील नागरिकांनी आगामी नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्धार केल्याचे चित्र दिसत आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण आणि प्रभाग क्रमांक १४ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार दीपक देशमुख व रुबिना अमजदखान यांच्या नुकत्याच झालेल्या जनसंपर्क दौऱ्याला नागरिकांनी उस्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद दिला.
प्रभाग १४ मध्ये ‘प्रेमाची लाट’ आणि ‘विकासाचा विश्वास’
प्रभाग क्रमांक १४ मधील सायंकाळ काल नागरिकांच्या प्रेम आणि उत्साहाने पूर्णपणे उजळून निघाली. भाजपच्या या प्रमुख उमेदवारांचा जनसंपर्क दौरा अत्यंत हृदयस्पर्शी आणि यशस्वी ठरला. शहरात स्वामी समर्थ कॉलनीपासून सुरू झालेला हा दौरा डॉ. संजय गोपाळराव देशमुख यांच्या निवासस्थानापर्यंत, पुढे तहजीब उर्दू स्कूल आणि प्रभात गल्लीपर्यंत पोहोचला.यावेळी सौ. प्रतिभाताई चव्हाण, नगरसेवक पदाचे उमेदवार दीपक गुलाबराव देशमुख, आणि रुबिना अमजदखान यांनी प्रत्येक कुटुंबाशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी नागरिकांमध्ये एक आनंद, विश्वास आणि मोठी अपेक्षा दिसून आली.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांबद्दल नागरीकांनी सकारात्मक आणि अभिमानास्पद प्रतिक्रिया व्यक्त केल्या, ज्यामुळे उमेदवारांच्या बाजूने एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे आभार मानले.









