• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्यसनाधीन मुलाचा बापाकडून खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 18, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
व्यसनाधीन मुलाचा बापाकडून खून

रावेर तालुक्यातील कुसुंब्यात मालमत्तेच्या वादातून धक्कादायक घटना!

रावेर (प्रतिनिधी ) – तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात कुसुंबा गावात एका व्यसनाधीन मुलाचा खून त्याच्या सख्या बापाने केला आहे. वारंवार होणाऱ्या शेतीच्या आणि मालमत्तेच्या हिश्श्याच्या मागणीवरून झालेल्या वादानंतर बापाने लाकडी मोगरीने मुलांचा खुन केल आहे.

मयत सचिन पाटील वय ३२ असे असुन बाप रविंद्र भगवान पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. सदर ही घटनाकुसुंबा, तालुका रावेर येथे  दि.१७ नोव्हेंबर सोमवार रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास  घडली.

मयत सचिन हा व्यसनाधीन होता आणि तो त्याचे वडील रविंद्र पाटील यांच्याकडे वारंवार शेती आणि घराच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागत होता. व्यसनामुळे रविंद्र पाटील प्रॉपर्टी देण्यास तयार नव्हते, ज्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. सोमवारी रात्री सचिन दारू पिऊन घरी आला आणि त्याने नेहमीप्रमाणे मालमत्तेवरून वाद घालण्यास सुरुवात केली. बाचाबाची वाढल्यानंतर आरोपी रविंद्र पाटील यांनी सचिनला खाली पाडले आणि खोलीतील दोरीने त्याचे हातपाय घट्ट बांधले. त्यानंतर खोलीत ठेवलेल्या लाकडी मोगरीने मुलाच्या डोक्यावर वार केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची हालचाल थांबली.घटनास्थळी रक्ताचे डाग असलेली लाकडी मोगरी, दारूची बाटली, ग्लास आणि स्प्राइटची बाटली आढळून आली.

बापानेच दिली कबुली

मुलगा ठार झाल्यानंतर आरोपी रविंद्र पाटील रात्रभर मृतदेहाजवळ बसून राहिले. दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज  मंगळवार १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:०५ वाजता त्यांनी स्वतः पोलीस पाटील रईस जाफर तडवी यांना फोन करून, “मी माझा मुलगा सचिन पाटील याला माझ्या घरातच मारून टाकले आहे,” अशी माहिती दिली आणि त्यांना घरी बोलावले. पोलीस पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तत्काळ पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना फोनद्वारे माहिती दिली.

पोलीस पाटील रईस तडवी यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी रविंद्र भगवान पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फैजपूर डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील आणि ठसे तज्ञ पथक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पुढील कार्यवाही सुरू केली.

सचिन पाटील हा अविवाहित होता आणि गेल्या तीन महिन्यांपासून कुसुंबा येथे वडीलांकडे राहत होता. त्याला त्याच्या वडीलांनी ऑटो घेऊन दिला होता, जो तो कुसुंबा ते रावेर प्रवाशी भाड्याने चालवत होता.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtravysnadhin mulacha bapakadun khun
Previous Post

जागतिक दमा जनजागृती दिनानिमित्त उद्या विशेष तपासणी शिबिराचे मोफत आयोजन

Next Post

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांची तपासणी होणार आता अधिष्ठातांच्या पातळीवर, राज्यभरात होणार फायदा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरसोद ते पाळधी या बायपास रस्त्याचे कामाला गती मिळावी

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांची तपासणी होणार आता अधिष्ठातांच्या पातळीवर, राज्यभरात होणार फायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड
1xbet russia

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे
1xbet russia

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

विश्वासघाताने ३ लाखांचे टरबूज लंपास; ट्रक मालक, चालकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

किराणा दुकानासमोरून सोयाबीन तेलाचे ३ बॅरल लंपास; ३३ हजारांची चोरी

March 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लूटमार करणारा गजाआड

March 3, 2026
निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोर दराडे

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon