आनंदा माता मंदिरातून प्रचाराचा ‘श्रीगणेशा’
चाळीसगाव (प्रतिनिधी):- येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीपूर्वीच चाळीसगावचे राजकीय वातावरण विकासाच्या मुद्द्यावर पूर्णपणे ढवळून निघाले आहे. शहरातील मतदारांनी आपला कौल स्पष्टपणे सत्ताधारी गटाच्या बाजूने दिला असून, ‘शत-प्रतिशत कमळ’ फुलवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. गेली अनेक वर्षे सत्ताधारी गटाने केलेल्या उत्कृष्ट विकासकामांवर चाळीसगावकरांनी आपला ठाम विश्वास दर्शवला आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत ‘काम बोलतयं’ हाच महत्त्वाचा मुद्दा ठरल्याचे चित्र आहे.

मंगेश दादांचं ‘नाणं’ पुन्हा खणखणीत!
सध्याच्या सर्व घडामोडींमध्ये विद्यमान नेतृत्वाची म्हणजेच तरुण तडफदार आमदार’मंगेश दादां’ची भूमिका निर्णायक ठरली आहे. “मंगेश दादांचं नाणं खणखणीत आहे!” अशा शब्दांत सामान्य नागरिक त्यांच्या कामाची प्रशंसा करत आहेत. दादांनी शहराच्या विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, पारदर्शक कारभार आणि सामान्य नागरिकांशी असलेला जिव्हाळ्याचा संपर्क यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप पक्षावर नागरिकांचा विश्वास अधिकच वाढला आहे. विरोधकांचे सर्व प्रयत्न या विकासकार्यापुढे निष्प्रभ ठरताना दिसत आहेत.
आनंदा माता मंदिरातून प्रचाराचा भव्य शुभारंभ
चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ काल दि. १३ रोजी आनंदा माता मंदिरात करण्यात आला. मंगेश दादांनी आपल्या पत्नीसह महाआरती करून प्रचाराचा श्रीगणेशा केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून औपचारिक सुरुवात करण्यात आली. या शुभारंभप्रसंगी भाजपचे भाविक नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाच्या मुद्द्यांवर भर देत, चाळीसगावकरांनी ‘कमळ’ पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून देण्याचा संकल्प केल्याचे बोलले जात आहे. यामुळे आगामी निवडणुकीत मंगेश दादांच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली ‘कमळ’ पक्ष विक्रमी यश नोंदवेल, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.










