खाजगी हाॅस्पिटल मध्ये तरुणावर उपचार सुरू
जळगाव: प्रतिनिधी -जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र थांबताना दिसत नसून, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील कढोली गावात आज (दि. ३) दुपारी ४ च्या सुमारास एका ३१ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?
प्राथमिक माहितीनुसार, जखमी तरुण एका खासगी कंपनीत कामाला आहे. उद्या (दि. ४) पारोळा येथील रथोत्सव असल्याने तो आपल्या आई-वडिलांना घेऊन जाणार होता. आज दुपारी ४ च्या सुमारास तो कढोली गावात अंडा पावच्या गाडीवर काही तरुण आले , अचानक एका तरुणाने गोळी झाडली आणि ती त्याच्या हाताच्या खांद्याखाली छातीजवळ घुसली. यामुळे मोठा रक्तस्राव झाला, ज्यामुळे त्याला तातडीने उपचारांसाठी जळगाव येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पंरतु तुरुणाची तब्येत चिंताजनक आहे. गोळीबार करणारे आरोपी जखमी तरुणाच्या परिचयाचे असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे गावात आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
पोलिसांकडून अद्याप या घटनेची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एरंडोल पोलीस नेमकी घटनास्थळ (कढोली गाव) आणि गोळीबारा मागील नेमके कारण काय होते, याचा कसून तपास करत आहेत. जळगाव खाजगी हाॅस्पिटल येथे स्थायिक गुन्हे शाखेचे पो.नि.गायकवाड,व पोलीस पोहोचले आहे.









