ग्रामविकास समितीत झाला समावेश
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने ही समिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री ग्राम विकास व पंचायत राजचे जयकुमार गोरे यांच्या अध्यतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत जळगाव येथील अॅड. गुरूदीपसिंग अहलुवालिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही समिती ग्रामीण क्षेत्रातील स्मशान भूमीबद्दलची सद्यस्थिती व समस्या यांचा आढावा तसेच उपाययोजना सुचविण्यासाठी कार्यरत राहिल. सदर समिती राज्यातील स्मशान भूमीतील सद्यस्थिती, स्मशानभूमी अद्ययावतीकरण करणे व स्मशान भूमी सुशोभिकरण करणे तसेच उपाय योजना करणे. हिंदू समाजातील दहन भूमी व दफन भूमी या विषयावर स्वतंत्र अध्ययन करणे, तसेच ग्रामीण भागातील सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्मशानभूमी सर्व नागरिकांसाठी खुल्या करण्यासाठी आढावा घेणे व उपाय सुचविणे असे परिपत्रकात म्हटले आहे. अॅड. गुरूदीपसिंग अहलुवालिया यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









