पारोळा शहरातील महामार्गावरील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – शहरातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सबगव्हाण येथील दुचाकीस्वार तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजता घडली आहे. याप्रकरणी सकाळी १० वाजता पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुरज शामदास ठाकरे (वय २५ रा. सबगव्हाण ता. पारोळा) असे मयत तरूणाचे नाव आहे. सबगव्हाण गावात सुरज शामदास ठाकरे हा तरूण वास्तव्याला होता. सोमवारी २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास सुरज हा त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच ५४ डी ६३४७) ने जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत सुरज ठाकरे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने कुटिर रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन हे करीत आहे.









