राष्ट्रीय स्पर्धेसाठी मिळाले महाराष्ट्राच्या संघात स्थान
जळगाव ( प्रतिनिधी ) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजी नगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन, जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा नंदिनीबाई महाविद्यालयाची विद्यार्थिनी निकिता पवार हिने १९ वर्ष आतिल मुलींच्या ५५ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकावले आणि जम्मू काश्मीर येथे होणार असलेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात स्थान निश्चित केले आहे.
तर ४२ किलो आतील वजन गटातील नुतन मराठा विद्यालयाची देवयानी पाटील हिने कांस्यपदक, अनुभूती निवासी स्कूल ची स्पर्श मोहिते हिने सुद्धा कांस्यपदक पटकावले तर १७ वर्ष वयोगटात मुलांमध्ये मयुर पाटील याने कांस्यपदक पटकावले यांना प्रशिक्षक जयेश बाविस्कर तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे l. सर्व विजेत्यांचे जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी, सदस्य श्री नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे, तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या*