बुलडाणा येथे घटना : भुसावळ तालुक्यात वरणगाव येथे शोककळा
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील श्री रामपेठ परिसरातील आठवडे बाजार भागातील रहिवाशी तसेच नगर परिषदेचे पाणीपुरवठा कर्मचारी सुनील भिका भुसांडे (वय ४८) यांचा दि .६ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे जात असतांना अपघात झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी दि. १० रोजी मृत्यू झाला. यामुळे वरणगाव येथे शोककळा पसरली आहे.
सुनील भुसांडे हे पहुर येथिल त्यांच्या मुलीची भेट घेऊन अजिंठामार्गे बुलढाणा येथिल त्यांच्या मित्राच्या वडिलांना पहाण्यासाठी जात होते. त्यावेळी घाट चढल्यावर बुलढाणा रस्त्यावर दुर्दैवाने त्यांच्या दुचाकीचा दुभाजकाला धडकून अपघात झाला. त्यांना बुलढाणा येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अखेर चार दिवस बुलढाणा येथे मृत्यूशी झुंज देत असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे वरणगाव येथे शोककळा पसरली आहे. त्यांचा मुलगा शिव हा पुणे येथे बीईच्या प्रथम वर्षाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.