वाचा, कोणत्या तालुक्याच्या सभापतींचे आरक्षण कोणते मिळाले ?
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये १५ पंचायत समिती सभापतींचे आरक्षण नवीन रुजू झालेले जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी ९ रोजी जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी पार पडले. यात एरंडोल व अमळनेर सभापती आरक्षण ओबीसी महिला तर भुसावळ पंचायत समितीचे सभापतीचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी निघाले आहे तर जामनेर, चाळीसगाव, जळगाव, धरणगाव हे सर्वसाधारण महिलांसाठी निघाले आहे
जळगाव जिल्ह्यात १५ पंचायत समिती सभापतीपदांची आरक्षण सोडत संपन्न झाली. या आरक्षण सोडत नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सोडतीतून संबंधित पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि कायदेशीर नियमांनुसार पार पडली. बैठकीस नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.संपूर्ण सोडत प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थितरीत्या पार पडली.
असे आहे आरक्षण
-अनुसूचित जाती महिला : पारोळा
-अनुसूचित जमाती महिला : बोदवड
-अनुसूचित जमाती : भुसावळ, चोपडा
-नामप्र : अंमळनेर, एरंडोल
-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : रावेर, मुक्ताईनगर
-सर्वसाधारण (महिला) : चाळीसगाव, जळगाव, जामनेर, धरणगाव
-सर्वसाधारण : यावल, पाचोरा, भडगाव