जळगाव शहरात बालाजीपेठ येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – सोन्याचे दागिने घडविणाऱ्या एका कारागीराने ज्वेलरीमधून सुमारे १३ लाख ९८ हजार रुपये किमतीचे सोने लुटले. शहरातील बालाजी पेठेतील लक्ष्मीनारायण ज्वेलर्स येथे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बिस्वजीत बनेस्वर सासमल (सोने कारागीर, हमु रिधुरवाडा, मुळ रा. वार्ड नं. १० जयनगर पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला. ३ लाख ७२ हजार किमतीचे ३१ ग्रॅम वजनाचे २४ कॅरेट सोन्याचा एक तुकडा, ५ लाख १८ हजार किमतीचे अंदाजे ४७ ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटची सोन्याची लगड, २ लाख ९८ हजार किमतीचे अंदाजे २७ग्रॅम वजनाचे २२ कॅरेटची सोन्याची लगड, २ लाख १० हजार किमतीचे अंदाजे १९ ग्रॅम वजनाची २२ कॅरेटची सोन्याची लगड असा सुमारे १३ लाख ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल संशयिताने लंपास केला. उपनिरीक्षक योगेश ढिकले हे तपास करीत आहेत.