आजाराने त्रस्त झालेल्या रूग्णाला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिलासा
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहराच्या आरोग्य सेवेत नव्यानेच पदार्पण केलेल्या महादेव सुपरस्पेशालिटी रूग्णालयात किडनी स्टोन (मुतखडा) या गंभीर समस्येवर रूग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, हा रूग्ण एसटी महामंडळातील कर्मचारी असून, गेल्या दोन वर्षांपासून तो या आजारामुळे त्रस्त होता.
एसटी कर्मचारी असलेले ५५ वर्षीय रुग्णाला गेल्या दोन वर्षांपासून सतत लघवीच्या तक्रारी, पोटदुखी आणि वारंवार होणार्या संसर्गामुळे अत्यंत त्रास सहन करावा लागत होता. प्रारंभी घरगुती उपचार आणि वेगवेगळ्या औषधोपचारांचा आधार घेतला, परंतु त्यातून काहीही फरक पडला नाही. दिवसेंदिवस वाढणार्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिन जीवनावर तसेच कामकाजावर परिणाम होऊ लागला होता. अखेर योग्य वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्याने जळगावातील महादेव सुपरस्पेशालिटी रूग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी आवश्यक त्या तपासण्या करून समस्येचे अचूक निदान केले. किडनीमध्ये ३० मीमी व्यासाचा मोठा स्टोन अडकून राहिल्याचे स्पष्ट झाले. आधुनिक वैद्यकीय साधनसामग्री आणि अनुभवी शल्यविशारदांच्या टीममुळे रूग्णावर दुर्बिणीद्वारे खड्याचा भुगा करून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून, त्याच्या लघवीतील त्रास तसेच पोटदुखी पूर्णपणे नाहीशी झाली आहे. रूग्णाने महादेव रूग्णालयातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यांनी केली शस्त्रक्रिया
ही शस्त्रक्रिया युरोलॉजी विभाग प्रमख डॉ.हेमंत केळकर, डॉ.शुभम चौधरी, डॉ..श्रीकांत रेड्डी, डॉ.फावडे यांनी केली. बधिरीकरण डॉ.भरत सोनवणे, डॉ. आकांक्षा, डॉ.विदीशा यांनी केले. आणि नर्सिंग स्टाफ समीर, सम्रुध्दी येवले यांचे सहकार्य लाभले. किडनी स्टोन ही समस्या सर्वसामान्य असली तरी दुर्लक्ष केल्यास ती जीवघेणी ठरू शकते. लघवी करताना होणारा त्रास, रक्तमिश्रित लघवी, पाठीमध्ये किंवा पोटात अचानक होणारी तीव्र वेदना ही लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. आज उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अशा शस्त्रक्रिया कमी वेळात व सुरक्षितपणे करता येतात.