• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विजेच्या खांबावर काम करताना “झिरो वायरमन’चा खांब्यावरून पडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विजेच्या खांबावर काम करताना “झिरो वायरमन’चा खांब्यावरून पडून मृत्यू

धरणगाव शहरातील लोहारी गल्लीत घटना, जळगावात नातेवाईकांचा आक्रोश

धरणगाव ( प्रतिनिधी ) – येथील महावितरण कार्यालयात ठेकेदारी पद्धतीने ‘झिरो वायरमन’ म्हणून काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय तरुणाचा विजेच्या खांब्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिलीप देवा भिल (वय ३६, रा. गारखेडा, ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. दिलीप भिल हा गेल्या १० वर्षांपासून धरणगाव येथील महावितरण कार्यालयात ठेकेदारी तत्वावर ‘झिरो वायरमन’ म्हणून कार्यरत होता. तो आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह गारखेडा गावात राहत होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी तो महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत धरणगाव शहरातील लोहार गल्ली परिसरामध्ये विजेच्या खांब्यावर काम करण्यासाठी गेला होता.

सकाळच्या सुमारास, सुमारे ९ वाजता दिलीप भिल खांब्यावर चढून काम करत असताना, अचानक तो जमिनीवर कोसळला. खांब्यावरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दिलीप याला मृत घोषित केले.

या अपघाताची माहिती मिळताच दिलीपच्या आई-वडील, पत्नी आणि नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. आपल्या तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच आईने केलेला मन हेलावून टाकणारा आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता. दरम्यान, दिलीप भिल हा कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ असल्याने आणि कामावर असताना अपघात झाल्याने, मयत तरुणाच्या कुटुंबीयांना महावितरणकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी एकलव्य संघटनेने केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही आणि ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत दिलीपचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. या संदर्भात धरणगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharatविजेच्या खांबावर काम करताना "झिरो वायरमन'चा खांब्यावरून पडून मृत्यू
Previous Post

सततच्या पावसामुळे पिकांवर रोगांचे संकट, बळीराजा हवालदिल

Next Post

गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला शिताफीने अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला शिताफीने अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon