• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

३५ हजार ग्राहक स्वावलंबी : पीएम-सूर्यघर योजनेत जळगाव परिमंडलाची झेप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे भव्य उद्घाटन संपन्न

१०० मेगॉवट क्षमता गाठणारे राज्यातील केवळ दुसरे परिमंडल

जळगाव (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत जळगाव परिमंडलातील ३५ हजार ग्राहक छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती करत आहेत. त्यांची स्थापित क्षमता १२८.१९ मेगावॅट असून, राज्यात शंभरी पार करणारे जळगाव हे नागपूरनंतर महावितरणचे केवळ दुसरे परिमंडल आहे.

दरमाह तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी-२०२४ मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केलेली आहे. घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी या योजनेत मिळत आहे. त्यामुळे या योजनेस जळगाव परिमंडलात वीजग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना मेळाव्यांद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. याबरोबरच महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे तसेच सौर नेटमीटरदेखील महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज संबंधित ग्राहकांना दिवसा वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून ती संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. ३०० युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. तसेच सुमारे २५ वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे.

पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प उभारण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प उभारल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या वेबसाईटवरील अक्षय ऊर्जा पोर्टलवरही अधिक माहिती व अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. महावितरणच्या जळगाव परिमंडलात योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत परिमंडलातील ३४ हजार ७५७ ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे.

यात जळगाव मंडलातील २१ हजार ३५४ ग्राहकांनी ७९.३७ मेगावॅट, धुळे मंडलातील ९ हजार २५४ ग्राहकांनी ३३.९७ मेगावॅट तर नंदुरबार मंडलातील ४ हजार ४१९ ग्राहकांनी १४.८५ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घराच्या छतावर बसवून वीज निर्मिती सुरू झालेली आहे. पीएम-सूर्यघर योजनेत सौर ऊर्जा संच बसवणाऱ्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या या योजनेचा घरगुती ग्राहक व निवासी संकुलांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून यासंबंधीच्या सर्व प्रकिया ऑनलाईन व सुलभ करण्यात आली आहे, असे आय.ए. मुलाणी, मुख्य अभियंता, महावितरण, जळगाव परिमंडल यांनी सांगितले आहे.

०००००००००००००००००००००


 

 

Tags: ३५ हजार ग्राहक स्वावलंबी : पीएम-सूर्यघर योजनेत जळगाव परिमंडलाची झेप
Previous Post

शिरसोली येथील गर्भवती मातेच्या आत्महत्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे भव्य उद्घाटन संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे भव्य उद्घाटन संपन्न

जळगावात 'हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्' चे भव्य उद्घाटन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन
जैन कंपनी

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत
खान्देश

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांतर्फे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साहित्य वाटप व मार्गदर्शन; हरवलेले १२ मोबाईल मूळ मालकांना परत

November 6, 2026
जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन
खान्देश

जळगावचे शासकीय रुग्णालय नेत्रोपचारासह अत्याधुनिक उपचारांचे आदर्श केंद्र बनवू – पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन

November 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

दिवाळी निमित्ताने आकाशवाणी जळगाव व चांदोरकर प्रतिष्ठान च्या वतीने “पाडवा पहाटची” या प्रात:कालिन मैफिलिचे आयोजन

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon