जळगाव एलसीबीची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : तांबापुरा परिसरातील जेके पार्क नजीक ६ ग्रॅम ‘एमडी’ या अमली पदार्थासह तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तर तर विक्री करणारा अरमान चिंधा पटेल हा पसार झाला. ही कारवाई शनिवारी दि. २० रोजी रात्री करण्यात आली.
जेके पार्क परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने जेके पार्क नजीकच्या स्विमिंग टॅक जवळून महमूद हनीफ पटेल (३५, रा. मास्टर कॉलनी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे ६० हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर, दोन मोबाईल असा ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर विक्री करणारा अरमान चिंधा पटेल हा पळून गेला. एमआयडीसी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.