जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०६० झाली

जळगाव ;- जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असून आज सकाळी प्राप्त अहवालानुसार २९ जणांच्या चाचणी अहवालांपैकी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात अमळनेर येथील ६ तर रावेर तालुक्यातील निंभोरासीम येथील १ असे ७ तर खासगी लॅबच्या अहवालात ३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यात जळगाव शहर सालारनगर १, बोदवड १, वरणगाव १ असे ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असून रुग्ण संख्या हि १० झाली आहे. आतापर्यंत आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०६० झाली असून आतापर्यंत ११८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४७८ जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे.आणि ४२९ जणांवर उपचार सुरु आहे.







