मुक्ती फाउंडेशन, अरुश्री परिवारतर्फे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : विश्वनेता, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत शासनासह सामाजिक स्तरावर सर्वत्र स्वस्थ नारी सशक्त परिवार व स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून सामाजिक बांधिलकीतून सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन,अरुश्री परिवार यांच्या माध्यमाने विशेष मोफत आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबिर तसेच स्वच्छता अभियानाचे आयोजन दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ०२ वाजेदरम्यान श्रीराम भवन येथील अरुश्री हॉस्पिट ,महेश प्रगती हॉल शेजारी रिंगरोड,जळगाव येथे करण्यात आले.
डॉ.स्वाती परिक्षीत बाविस्कर (एमडी मेडिसिन) या आरोग्य शिबिराअंतर्गत हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह,थायरॉईड, जनरल तपासणी आदी करतील तर आयोजकांच्या वतीने स्वच्छता अभियाना निमित्त श्रीराम भवन परिसरात स्वच्छता करण्यात येणार आहे. महिलांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मुक्ती फाउंडेशन तर्फे मुकुंद गोसावी यांनी केले आहे.