जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे भारतरत्न, महामानव अभियंता व द्रष्टे राष्ट्रपुरुष सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. या निमीत्ताने महाविद्यालयात विभागनिहाय विविध उपक्रम राबवण्यात आले.
यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातर्फे भाषण स्पर्धा व वादविवाद स्पर्धा,इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार विभागातर्फे वक्तृत्व स्पर्धा, गटचर्चा तसेच एक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. कॉप्युटर अभियांत्रिकी विभागा तर्फे कोडिंग क्लब उपक्रम व भाषण स्पर्धा घेण्यात आली. विद्युत अभियांत्रिकी विभागाने रॅपिड फायर क्विझ स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेतली. तर एआय अँड डीएस (-खऊड) विभागाने अगदी वेगळा उपक्रम राबवला – कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नाविन्यपूर्ण स्लाईड्स तयार करण्याची स्पर्धा. या सर्व उपक्रमांचे उद्घाटन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विविध विभाग प्रमुखांसह केले. प्राचार्यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना नवीन कल्पकता स्वीकारण्याचे, तांत्रिक दृष्टीकोन विकसित करण्याचे व आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे मार्गदर्शन केले.विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमांना प्रा. तुषार कोळी (डीन अकॅडेमिक्स व यांत्रिकी विभाग प्रमुख), डॉ. नितीन भोळे ( बेसिक सायन्सेस अँड ह्युमिनिटीज), डॉ. हेमंत इंगळे ( ईटीसी विभाग प्रमुख), प्रा. निलेश वाणी (कंप्युटर विभाग प्रमुख), प्रा. महेश एच. पाटील (विद्युत विभाग प्रमुख) व डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा ( एआयडीएस विभाग प्रमुख) इ उपस्थीत होते.
विभाग निहाय विजेते यंत्र विभाग भाषण स्पर्धा आशिष खाचणे (तृतीय यंत्र)डिबेट स्पर्धा मयूर कोळी व ग्रुप ई अँन्ड टीसी विभाग वकृत्व स्पर्धा ऋतुजा ठेंग(प्रथम वर्ष) ग्रुप डिस्कशन प्राजक्ता व नंदिनी पाटील (द्वितीय वर्ष) एआयडीएस विभाग इनोव्हेटिव्ह स्लाईड विथ एआय प्रथम यश चौधरी (तृतीय वर्ष) द्वितीय देवयानी पाटील (द्वितीय वर्ष) विद्युत विभाग रॅपिड क्विझ फायर प्रथम भावेश पाचपांडे ग्रुप (द्वितीय वर्ष) द्वितीय गणेश कदम ग्रुप (द्वितीय वर्ष) ट्रेझर हंट विनर आनंद नारखेडे ग्रुप संगणक विभाग भाषण स्पर्धा प्रथम जानवी बोरसे (तृतीय वर्ष)द्वितीय यतीश भारंबे (द्वितीय वर्ष) सदर उपक्रमाबाबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट), डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.