जळगाव ( प्रतिनिधी ) – जागतिक फिजिओथेरपी दिन सप्ताहानिमीत्त डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रॅलीचे आयोजन प्राचार्य डॉ. जयवंत नागुळकर, श्री. राहुल गिरी, डॉ. अमित जायसवाल आणि डॉ. रिया अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रॅली भाऊंचे उद्यान येथून सुरू होऊन गांधी उद्यान, जळगाव येथे संपन्न झाली. या रॅलीचे उद्दिष्ट या रॅलीचे यावर्षीचे विशेष थीम सुदृढ वार्धक्य अशक्तपणा व पडणे टाळा तसेच फिजिओथेरपीचे आरोग्यातील महत्त्व पटवून देणे याचबरोबर खरे आणि खोटे फिजिओथेरपिस्ट यांमध्ये फरक ओळखण्याबाबत जनजागृती करणे हे होते. रॅलीच्या प्रारंभ व समारोप स्थळी विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर नाटिका सादर केली. या प्रसंगी प्राचार्य डॉ. जयवंत नागुळकर यांनी जनतेला फिजिओथेरपीचे खरे महत्त्व समजून घेण्यास व केवळ पात्र फिजिओथेरपिस्ट कडूनच उपचार घेण्यास प्रवृत्त केले. या रॅलीमध्ये जनजागृतीपर फलक घेवून सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच जळगाव डिस्ट्रिक्ट फिजिओथेरपी असोसिएशनचे सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.