जळगाव (प्रतिनिधी) :- जागतिक फिजिओथेरपी दिन सप्ताह २०२५ च्या उत्सवाचा एक भाग म्हणून रक्तदान शिबिर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढीमध्ये आयोजित करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून डीन डॉ. प्रशांत सोलंके, प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर व डॉ. रिया अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. हे शिबिर यशस्वीरित्या डॉ. अनुराग मेहता आणि डॉ. वैष्णवी चौधरी यांच्या संयोजनाखाली आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि कर्मचारीवर्गाने उत्साहाने सहभाग घेतला. एकूण ५० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले व शिबिर अत्यंत यशस्वी झाले.