जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली 1050 वर


जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असून रात्री उशिरापर्यंत दोन अहवाल प्राप्त झाले आहे. 118 स्वब अहवालात 14 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले व दुसऱ्या 72 स्वब अहवालात 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असा एकुण 30 कोरोना रुग्णांनाचा पॉझिटिव्ह अहवाल दोन रिपोर्ट मध्ये रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या आता 1050 झाली असून आतापर्यंत 117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 478 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे.आणि 429 जणांनवर उपचार सुरु आहे. 35 रुग्ण अत्यवस्थ आहेत .
जळगाव शहर 5, भुसावळ 2, अमळनेर 9, यावल 3, चुचाळे 3, आमोदा 1, न्हावी 1, एंरडोल 4, रावेर 1, व बाहेरील जिल्ह्यातील धुळे येथील 1, असे एकुण 30 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.







