माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांची उपस्थिती
तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन प्रमोद पाटील, रामकृष्ण काटोले, शिवदास बारी, संतोष ताडे, पंचायत समिती सदस्य नंदू पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रमोद पाटील होत्या. अध्यक्षीय भाषणात प्रताप पाटील यांनी, शालेय परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. संस्था गोरगरीब मुलांना शिक्षण देत आहे असा उल्लेख करून, येथे गोरगरिबांची मुलं शिक्षण घेत आहे. गोरगरिबाच्या मुलांनी शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचावे असे सांगितले. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले तर आभार एस के पांडे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.