बोदवड तालुक्यातील घटना, संशयित आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी
बोदवड प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील दलित मुलीला संशयित आरोपी शेख नाजिम शेख साबीर (वय ३१, रा.भुसावळ, जाम मोहल्ला, ह.मु बोदवड) याने फुस लावून दि. २४ रोजी पळवून नेत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम २०२३ नुसार कलम ६४, ६४ (२) (एम), ६५, (१), सह कलम ४, ६, ८, १२ पोस्कोसह कलम अॅट्रॉसिटी कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर संशयित आरोपीला भुसावळ न्यायालयामध्ये नेण्यात आले असून त्याला न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यामध्ये दिले आहे. सदर प्रकरणांची फैजपूर उपविभागीय पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावातील इ.९ वी शिक्षण घेत असलेली १५ वर्षीय मुलीला घराशेजारी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मजुर म्हणून काम करत असलेल्या संशयित आरोपी शेख नाजिम शेख बशीर (वय ३१, रा. जाम मोहल्ला, भुसावळ, ह.मु. रा. म्हसोबा देवस्थान बोदवड) या तरुणाने दि. २४ रोजी रात्री ८ ते १२ वाजेदरम्यान अपहरण करुन नेले.
सदर विद्यार्थिनीवर सुरत, उधना यासह वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर संमती नसताना अत्याचार केला तसेच तिला सोडून पळून गेला. याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात अपहरणचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.