जळगावच्या बस स्थानकातील घटना, जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील नवीन बसस्थानकात दोंडाईचा-जळगाव या बसमध्ये अमळनेर तालुक्यातील वृद्धाचा मोबाईल फोन लांबवणाऱ्या तरुणाला जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे
जळगाव नवीन बस स्थानकात चोऱ्या नियमित सुरू आहेत. सोमवार दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता वाजता जळगाव शहरातील नवीन बस स्थानकात जळगाव दोंडाईचा बसमध्ये फिर्यादी मंगल मूलचंद पाटील (वय ६३, रा. पाडळसरे ता. अमळनेर) हे प्रवास करीत होते. दरम्यान त्यांचा ५ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दुपारी अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ शोध घेत चोरटा गौरव जगन कोळी (वय २२, रा. गेंदालाल मिल, जळगाव) यास त्याच दिवशी सोमवारी संध्याकाळी ५ वाजता अटक केली आहे. घटनेचा तपास निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल नरेश सोनवणे करीत आहेत.