भडगाव तालुक्यात वाडे येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी) :- येथील २० वर्षीय तरुण बकरीसाठी चारा घेण्यास गेला असता त्याचा गिरणा नदी पात्रातील पाण्यात पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाडे येथील रहिवाशी मच्छिंद्र आत्माराम मरसाळे (वय १९) हा तरुण दि. १८ रोजी दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान बकऱ्यांना चारा घ्यायला गेला होता. वाडे येथील दत्त मंदिराच्या जवळपास गिरणा नदीपात्रात त्याचा पाय घसरुन पाण्यात वाहुन गेला. गिरणा नदीलगत तसेच काठावर ठिकठिकाणी नातेवाईकांसह त्याचा
शोध घेतला असता तो सावदे दलवाडे गिरणा नदीच्या पुलाजवळ मृतावस्थेत आढळला. ही घटना दि. १९ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. भडगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील आणले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषीत केले. मृतावर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. भडगाव पोलीस स्टेशनला वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, भडगाव यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर सोनवणे हे करीत आहेत.